प्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली आणि मुंबई हाय अलर्टवर
देश बातमी

प्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली आणि मुंबई हाय अलर्टवर

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी खलिस्तानी आणि अल कायदा यासारख्या दहशतवादी संघटनांकडून या दिवशी घातपाती हल्ला घडवून आणला जाऊ शकतो, अशी गुप्तचर यंत्रणांकडून दिल्ली पोलिसांना माहिती मिळाली आहे. यानंतर आता दिल्ली पोलिस सतर्क झाले असून ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्था अधिकच कडक करण्यात आली आहे, तर वाँटेड दहशतवाद्यांचे पोस्टर्स जागोजागी लावण्यात आले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

याबाबत माहिती देताना दिल्लीतील कॅनॉट प्लेसचे एसीपी सिद्धार्थ जैन म्हणाले की, ”खलिस्तानी आणि अल कायदासह काही दहशतवादी संघटनांकडून प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी घातपाताची स्थिती निर्माण केली जाऊ शकते, अशी आम्हाला माहिती मिळाली आहे. पार्श्वभूमीवर सतर्कता म्हणून आम्ही वॉण्टेड दहशतवाद्यांचे पोस्टर्स लावण्यासह काही पावलं उचचली आहेत.

दरवर्षीप्रमाणे यंदाही दिल्लीत १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी सारख्या देशाच्या महत्वाच्या दिवशी सुरक्षा व्यवस्थेसमोर दहशतवादाचे सावट असतेच त्याला पोलीस सामर्थ्याने सामोरे जातात. मात्र, राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या दीड महिन्यापासून शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनात होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन दहशतवादी घातपाती कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी ठिकठिकाणी संशयित दहशतवाद्यांची शोधमोहीम देखील सुरू करण्यात आली आहे.

तर दुसरीकडे, महाराष्ट्राची राजधानी मुंबईतही २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिन आणि मुंबईला दहशतवादी हल्ल्याच्या मिळणाऱ्या धमक्या लक्षात घेऊन हा आदेश काढण्यात आला आहे. मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ३१ डिसेंबर 2020 ते २९ जानेवारी २०२१ या कालावधी ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलवर चालणारे मायक्रो लाईट एअर क्राफ्ट, एरिएल मिसाईल आदी तत्सम उपकरणीय वापरांवर (Flying Activities) बंदी आदेश काढण्यात आले आहेत. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात भा. दं. वि . कलम १८८ अन्वये कारवाई केली जाईल. त्याचबरोबर शहरातील सुरक्षा व्यवस्था पाहता खबरदारीचा उपाय म्हणून गृह विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.