देश बातमी

छेडछाड करणाऱ्या रोडरोमियोला तरुणीने घडवली चांगलीच अद्दल

मेरठ : मेरठच्या लिसाडी गेट पोलिस स्टेशन परिसरात एका तरुणीने एका छेडछाड करणाऱ्या रोडरोमियोला चांगलीच अद्दल घडवली आहे. त्याच्याच दुचाकीवर बसून तिने त्याच्यासोबत पोलीस चौकी गाठली आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. इतकेच नव्हे तर त्याची कॉलर पकडून त्याला ओढत पोलीस चौकीत उभे केले आणि त्याच्याविरुध्द तक्रारही दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्याचे झाले असे की, मेरठच्या लखीपुरा परिसरात राहणाऱ्या एका तरुणीला एक रोडरोमियो गेल्या की दिवसांपासून छेडछाड करीत होता. तसेच कुटुंबियांना याबाबत सांगितल्यास तानाही जीवे मारण्याची धमकी द्यायचा. शेवटी या सर्व त्रासाला कंटाळलेल्या तरुणींनी त्याला धडा शिकवण्यासाठी तिने योजना आखली आणि त्यानंतर तिने केलेल्या धाडसाचे कौतुकच करावे लागेल.

मुलीने आरोपीच्या मोबाईलवर कॉल केला आणि सांगितले की तिला त्याला भेटायचे आहे. त्यावर आरोपी देखील तरुणीने सांगितलेल्या पत्त्यावर पोहचला. तेथे तरुणी त्याच्या दुचाकीवर बदली आणि त्याला सांगितले की तिला चाऊमीन खाण्याची इच्छा आहे. चाऊमीन खाण्यासाठी आपण झाकीर कॉलनीत जाऊ. त्यानुसार ते दोघे झाकीर कॉलनीत निघाले.

जेव्हा ते दोघे झाकीर कॉलनीजवळून जात होते तेव्हा तरुणीला समोरच पोलिसचौकी दिसली. त्यानंतर तिने गाडी थांबवायला सांगितली आणि खाली उतरताच त्याची कॉलर पकडून त्याला खाली पाडले. फरफटतच ती पोलीस चौकीत घेऊन गेली आणि त्याची तक्रार केली. तरुणीची ताक्रात लिहीन घेत पोलीसानीही त्या रोडरोमियोला त्यात घेतले. अशा प्रकारे तिने घडलेली सर्व हकीकत सांगितली आणि पोलिसांनीही लगेच त्याला अटक केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत