मग किमान नक्षलवादी होण्याची परवानगी द्या; शेतकऱ्याचे  मुख्यमंत्र्यांना पत्र
बातमी महाराष्ट्र

मग किमान नक्षलवादी होण्याची परवानगी द्या; शेतकऱ्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र

दुष्काळ आणि नापिकी आणि कर्जबाजरीपणाला कंटाळून राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या प्रसिद्ध होताना आपण पाहतो. मात्र हिंगोलीमधील एका तरुण शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहित थेट नक्षलवादी होण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे. हिंगोलीतील सेनगाव तालुक्यातील ताकातोडा गावाचे शेतकरी नामदेव पतंगे यांनी हे पत्र लिहीलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

प्रशासन शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या पत्रामध्ये पतंगे यांनी केलाय. इतकेच नव्हे तर प्रशासनाने अशी भयान परिस्थिती करुन ठेवली आहे की आता नक्षवादी होण्याशिवाय काहीही पर्याय उरलेला नाही, असं पतंगे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

काय लिहील आहे नामदेव पलंगे यांनी पत्रात?
माझे वडील, माझे आजोबाही शेतीच करायचे. मग आमचा वडिलोपार्जित व्यवसाय जर शेती असेल तर आम्हाला एक वर्षीचा दुष्काळ का सहन होऊ नये? मुख्यमंत्री महोदय तुमच्या शासन व्यवस्थेने आमच्या अंगाच्या चिंधड्या करून ठेवल्या. तुम्ही कर्जमाफी दिलीत पण ती आमच्यापर्यंत पोचलीच नाही, तुम्ही योजना आणली पिकेल ते विकेल पण आमच्याकडे पिकलंच नाही तर विकावं काय? पत्रात मांडलेली कैफियत केवळ माझीच नसुन माझ्यासारख्या हजारो तरुणांची आहे.

तुम्ही पिकलं नाही म्हणुन अनुदान दिलंय. पण नुकसान एक हेक्टर आणि मदत नऊ हजार. तुमचे लाईनमन दादागिरी करायला लागेलत, न सांगताच लाईन कापत आहेत. तुमच्या बँका अजुनही शेतकऱ्यांना पीककर्ज द्यायला तयार नाहीत. मग किमान नक्षलवादी होण्याची परवानगी तरी द्या, असं या पत्रात पतंगे यांनी म्हटलं आहे. निसर्गाने शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. तुम्ही सांगितलेलं की पाच एकरासाठी २० हजार रुपये देऊत पण प्रशासनाने आमच्या हाती नऊ, पाच हजार देऊन आमची बोळवण केली. महावितरणचे अधिकारी वीज कापण्यासाठी येत आहेत. आता गुरांना पाणी देण्याचा प्रश्नही निर्माण झालाय. पतंगे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राच्या शेवटी त्यांनी स्वत:ची ओळख ‘तुमच्या महाराष्ट्रातील एक अभागी शेतकरी’ अशी करुन दिलीय.

मागील काही महिन्यांमध्ये शेतकऱ्यांवर एका मागून एक नवीन संकट येत आहेत खरिपाचा हंगाम सुरु झाला तेव्हा पावसाने दिलेला ताण. त्यानंतर पुन्हा झालेली अतिवृष्टी यामध्ये शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. पंचनामे करुन नुकसानभरपाई देण्यात आली मात्र झालेल्या नुकसानासमोर मिळालेली रक्कम अगदीच शुल्लक होती. शेतीतील पीक उद्धवस्त झालं. शासकीय मदत देण्यात आली. मात्र, ती मदत ही नुकसानापेक्षा अत्यंत कमी मिळाली. पीक विम्याचाही प्रश्न निर्माण झाला, एक ना अनेक अशा समस्यांनी शेतकऱ्यांचे मोठे हाल केले आहेत. त्यातच आता वीज कट करण्यात येत असल्याने पाणी असुनही शेती आणि जनावरांना पाणी देता येत नाहीये त्यामुळे शेतकरी अजूनच संतापलेत त्यातुनच नामदेव पतंगे यांनी उद्विग्न होऊन मुख्यमंत्र्यांकडे थेट नक्षलवादी होण्यासाठी परवानगी मागितलीय.