‘हे’ आहेत जगातील सर्वात प्रामाणिक  देश; तर भ्रष्टाचाराच्या यादीत भारत ‘या’ क्रमांकावर
देश बातमी विदेश

‘हे’ आहेत जगातील सर्वात प्रामाणिक देश; तर भ्रष्टाचाराच्या यादीत भारत ‘या’ क्रमांकावर

काही वर्षांपासून जगभरातील प्रामाणिक  देशांची यादी प्रसिध्द केली जात आहे. मात्र तरीही अनेक देश त्यांच्या देश भ्रष्टाचारमुक्त करण्यात अयशस्वी ठरले आहेत. मग आता भ्रष्टाचाराच्या बाबतीत जगातील १८० देशांमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो, जगभरातील सर्वात जास्त भ्रष्टाचारी आणि इमानदार देशांची यादी ट्रान्सपेरेंसी इंटरनॅशनलने जाहीर केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ट्रान्सपेरेंसी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार, डेन्मार्क, न्यूझीलंड, फिनलँड, सिंगापूर आणि स्वीडन हे सर्वात प्रामाणिक देश ठरले, तर वेनेझुएला, येमेन, सिरिया, सोमालिया आणि दक्षिण सुदान या देशात सर्वात जास्त भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे.

या सर्वात भारताबद्दल बोलायचे झाल्यास भ्रष्टाचाराच्या बाबतीत 180 देशांच्या यादीत भारत 86 व्या क्रमांकावर आहे. तर सन 2019 मध्ये भारत 80 व्या स्थानावर होत. विशेष बाब म्हणजे ज्या देशांमध्ये भ्रष्टाचार कमी त्या देशांमध्ये कोरोना महामारीचा सामना अधिक प्रभावीपणे केल्याचे या अहवालातून समोर आले आहे.

ट्रान्सपरेन्सी इंटरनॅशनलचा अहवाल तयार करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचे मत घेतले जाते. त्यांच्याकडून सर्वात भ्रष्टाचारी आणि सर्वात इमानदार देशांची गुणवत्ता ठरवली जाते. ही गुणवत्ता शून्यापासून १०० गुणांच्या आधारे केली जाते. जिथे भ्रष्टाचार सर्वाधिक तो देश शून्यावर असतो, तर १०० गुण असलेला देश सर्वात प्रामाणिक.

भ्रष्टाचाराच्या बाबतीत पाकिस्तानची स्थिती अत्यंत वाईट आहे. तो भारताच्याही खाली आहे. 180 देशांच्या यादीत पाकिस्तान 124 व्या क्रमांकावर आहे. या यादीत चीन 78 व्या, नेपाळ 117 व्या आणि बांगलादेश 146 व्या स्थानावर आहे. स्वत: ला जगातील सर्वात सामर्थ्यवान म्हणणारी अमेरिका 67 व्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये अमेरिकेची क्रमवारीही कमी झाली आहे.

कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी आणि त्याला पराभूत करण्यासाठी न्यूझीलंडचे खूप कौतुक झाले आहे. या देशात कोणताही भ्रष्टाचार नाही. प्रामाणिक देशांच्या यादीत न्यूझीलंड आणि डेन्मार्क हे दोन्ही देश 88 गुणांसह पहिल्या स्थानावर आहेत. तर फिनलँड 85 गुणांसह तिसरा सर्वात प्रामाणिक देश आहे.

ट्रांसपेरेंसी इंटरनॅशनलच्या अहवालात दक्षिण सुदान आणि सोमालिया हे सर्वाधिक भ्रष्टाचार करणारे देश आहेत. भ्रष्टाचाराच्या यादीत हे दोन्ही देश १२ व्या स्थानावर आहेत. 180 देशांच्या यादीत दोन्ही देश 179 व्या क्रमांकावर आहेत.

भ्रष्टाचाराच्या प्रकरणात 26 देशांनी आपली स्थिती सुधारली आहे. यामध्ये ग्रीस आघाडीवर आहे. ग्रीसने प्रामाणिकपणाच्या बाबतीत 14 स्थानांवर आघाडी घेतली आहे. म्यानमारने 13 स्थानांवर आघाडी घेतली आहे. तर इक्वाडोर 7 व्या स्थानांवर आघाडी घेतली आहे. त्याच वेळी, अशी 22 देश असे आहेत ज्यांच्या संख्येत घसरण झाली आहे. बोस्निया-हर्झेगोविना आणि मलावी या देशांच्या संख्येत 7-7 क्रमांकाची घसरण झाली आहे. तर लेबेनॉनही पाच क्रमांकवर घसरला आहे.