धक्कादायक ! पुण्यात नव्या कोरोनाचे आणखी 3 रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

धक्कादायक ! पुण्यात नव्या कोरोनाचे आणखी 3 रुग्ण

पुणे : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर कमी झाला असला तरी नवा कोरोना हातपाय पसरताना दिसतो आहे. नव्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता आणखी वाढली आहे. मुंबईपाठोपाठ आता पुण्याचाही धोका वाढला आहे. पुण्यात नव्या कोरोनाचे आणखी 3 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाचा नवा स्ट्रेन असलेल्या कोरोना रुग्णांची पुण्यातील संख्या आता 4 वर पोहोचली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

महाराष्ट्रातील नव्या कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 11 वर पोहोचली आहे. आज पुण्यात तीन रुग्ण आढळले आहेत. हे तिन्ही रुग्ण पिंपरी-चिंचवडमधील आहेत. याआधी राज्यात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा संसर्ग झाल्याचे 8 रुग्ण सापडले होते. त्यात मुंबईतील 5, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

देशात नव्या कोरोनाचे एकूण 73 रुग्ण झाले आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता केंद्र सरकारनं कठोर पावलं उचलण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. देशातील एकूण कोरोना प्रकरणांपैकी तब्बल 59% प्रकरणं फक्त या चार राज्यांमध्ये आहेत. यामध्ये महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल या चार राज्यांचा समावेश आहे. या राज्यांना केंद्रीय आरोग्य सचिवांनी पत्र दिलं आहे.