चीनच्या खाणीत काम करणाऱ्या तीन मजुरांचा अचानक झाला होता मृत्यू; कोरोनाशी आहे मोठा संबध
बातमी विदेश

चीनच्या खाणीत काम करणाऱ्या तीन मजुरांचा अचानक झाला होता मृत्यू; कोरोनाशी आहे मोठा संबध

चीन मानो अथवा न मानो , परंतु संपूर्ण जगाला माहित आहे की, कोरोना व्हायरसची उत्पत्ती चीनमधूनच झाली आहे. आजपासून सुमारे 12 वर्षांपूर्वी चीनमधील खेड्यात एका डोंगराच्या खाणीत काम करणाऱ्या तीन मजुरांचा गूढ आजाराने मृत्यू झाला होता. तेव्हापासून ती खाण चीनने कायमस्वरूपी बंद केली. जिथे आजही कोणालच जाण्याची परवानगी दिली जात नाही. काही आंतरराष्ट्रीय पत्रकारांनी तिथे जाण्याची परवानगी मागितली होती. मात्र त्यानाही त्या ठिकाणी जाण्याची परवानगी दिली गेली नाही.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

चीनमधील या खाणींना कोरोना विषाणूचे ब्लॅकहोल असे म्हणतात. याच कारण म्हणजे दक्षिण चीनमध्ये असलेल्या या खाणीमध्ये आढळणाऱ्या वाटवाघळांमुळे पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे आज जगभरातील लाखो लोकांनी आपले जीव गमावले आहेत. १२ वर्षापूर्वी रहस्यमयी न्यूमोनियामुळे ज्या तीन मजुरांचा मृत्यू झाला, यावरून असे दिसून येते की, खाणीतून मिळालेल्या पुराव्यांमध्ये वर्तमानातील कोरोना विषाणू त्या काळातील विषाणूसारखे होते.

कोरोनावर संशोधन करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञांना त्या ठिकाणी जायचे आहे, परंतु चीन सरकार कोणालाही त्या ठिकाणी जाऊ देत नाही. वृत्तसंस्था असोसिएटेड प्रेस (एपी) च्या पत्रकारांनीही तेथे जाण्याचा प्रयत्न केला पण त्यांनाही तिथे जाऊ दिले नाही. गुप्त पोलिसांनी, खेड्यातील लोकांनी त्यांना पुढे जाऊ दिले नाही. साध्या कपड्यांतील पोलिसांनीही एपी पत्रकारांच्या गाडीचा पाठलाग करून त्या ठिकाणी जाण्यापासून रोखले.

चीन सरकारने कोरोना विषाणूबाबत संशोधन करणाऱ्या स्थानिक संशोधकांना माध्यमांशी बोलण्यावर बंदी घातली आहे. एवढेच नव्हे तर कोरोना विषाणूशी संबंधित अभ्यास आणि संशोधन करणार्‍या वैज्ञानिकांवर चीन सरकार पूर्ण लक्ष ठेवून आहे. एखादी गोष्ट सरकारच्या विरुद्ध आढळून आल्यास ती त्वरित बंद केली जाते. धक्कादायक बाब म्हणजे, या वैज्ञानिकांना कोरोना व्हायरस चीनच्या बाहेरून पसरला आहे, हे लोकांना सांगण्यास भाग पडले जाते.

कोरोना विषाणूवर संशोधन करता यावे म्हणून चीनी सरकार चिनी शास्त्रज्ञांना कोट्यवधी रुपयांचे अनुदान देत आहे. परंतु या शास्त्रज्ञांना चीन सरकारने चीनी सैन्याशी जोडले आहे. चिनी सैन्य या संशोधकांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहे. चीनमध्ये केलेले कोणतेही संशोधन प्रकाशित करण्यापूर्वी ते चिनी सरकारच्या मंत्रिमंडळाने मंजूरी अनिवार्य आहे. चीनी मंत्री मंत्रिमंडळाला सर्वकाही योग्य वाटत असेल तर केवळ संशोधन पेपर प्रकाशित केला जातो.

कोरोना विषाणूबाबत चिनी अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नेतृत्वात एक टास्क फोर्स तयार करण्यात आले आहे. हे टास्क फोर्स संपूर्ण चीनमध्ये होत असलेल्या सर्व कामांवर नजर ठेवते. कोरोना विषाणूसंदर्भात कोणत्याही प्रकारची ऑर्डर येथूनच येते. तथापि, चीनी सरकार आणि स्थानिक लोक एपी पत्रकारांना 12 वर्षांपूर्वी रहस्यमय न्यूमोनियामुळे कामगारांचा मृत्यू झालेल्या गुहेत जाऊ दिले नाही.

एपी पत्रकारांना कोणत्याही प्रकारचे शोधनिबंध मिळविता आले नाही. चीनच्या वैज्ञानिकांना एपी पत्रकारांच्या टीमशी बोलण्याचीही परवानगी दिली जात नाही. एपी पत्रकारांना कोरोना विषाणूचे सर्वात जवळचे केंद्र असलेल्या हिल माईनच्या खूप अलीकडेच रोखण्यात आले. २०१२ मध्ये त्याच डोंगराच्या खाणीत बांधलेल्या शाफ्टची साफसफाई करताना सहा मजूरांना रहस्यमयी न्युमोनिया झाला होता. तर इतर तीनजणांना ओला जीव गमवावा लागला.

एपीचा तपास जगभरातील शास्त्रज्ञ, अधिकाऱ्यांच्या मुलाखती, सार्वजनिक सूचना, लिक झालेले ईमेल, चीनच्या मंत्रिमंडळाचा अंतर्गत डेटा आणि चीनी रोग नियंत्रण व प्रतिबंधक चिनी सेंटरच्या कागदपत्रांवर आधारित आहे. आता कोरोना विषाणूबद्दल चीनी सरकार किती गुप्त मोहीम राबवित आहे; हे या सर्व गोष्टीवरून दिसून येते. या कारणास्तव, चिनी सरकारने जागतिक आरोग्य संघटनेला कोरोना विषाणूची बातमी उशिरा दिली होती.

याच कारण म्हणजे, चीनमध्ये थेट कोणतीही माहिती प्रसारित करण्यास किंवा सामायिक करण्यास मनाई आहे. त्याला सर्वप्रथम चीनच्या अधिकारी व नेत्यांनी पाहिले आहे. जर ते देशाच्या हिताचे असेल तर आम्ही प्रथम ते जारी करतो अन्यथा ते अत्यंत महत्वाचे होईपर्यंत कोणतीही वाच्यता केली जात नाही. कोरोना विषाणू जगभर पसरला तेव्हा चिनी परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले की वैज्ञानिकांनी आंतरराष्ट्रीय संशोधन सुरू करावे आणि जागतिक स्तरावर एकमेकांना मदत करावी.

एपी पत्रकारांच्या तपासात असे आढळून आले की, 10 आणि 11 जानेवारी रोजी डझनभर संशोधकांनी वुहानमधून कोरोना विषाणूचे नमुने गोळा केल्याची माहिती दिली होती, यानंतर, चिनी राज्य माध्यमांनी सांगितले की गोळा केलेल्या नमुन्यांपैकी 33 सकारात्मक आहेत. पण हळूहळू शास्त्रज्ञ आणि माध्यम कामगारांवर बंदी घातलण्यात आली. जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यात जितके शोधनिबंध प्रकाशित झाले होते, ते मार्चपर्यंत जवळपास संपुष्ठात आले होते.