धक्कादायक! नदीच्या पात्रात बुडून तीन मुलींचा मृत्यू
बातमी विदर्भ

धक्कादायक! नदीच्या पात्रात बुडून तीन मुलींचा मृत्यू

गडचिरोली : वैनगंगा नदी पात्रात बुडून तीन मुलींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गडचिरोली जिल्ह्यीत चामोर्शी तालुक्यात ही घटना घडली आहे. मुली नावेतून नदीपार जात होत्या. त्याचवेळी नाव बुडाली आणि तिघींचा मृत्यू झाला. ही घटना आज (ता. १८) मंगळवारी दुपारी घडली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तीनही मुली नावेतून प्रवास करत असताना तोल जाऊन खाली पडल्या, या मुलींना पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून बुडून मृत्यू झाला. सोनी मूकरू शेंडे (१४) समृध्दी ढिवरु शेंडे (१५) व पल्लवी रमेश भोयर (१३) असे या तीन मुलींचे नाव आहे. या तीन शाळकरी मुली मंगळवारी दुपारी दुपारी वैनगंगा नदीच्या पात्रात नावेवर (डोंगा) बसून दुसऱ्या काठावर आंबे तोडण्याकरिता जात होत्या. नदीपात्र पार करत असताना नाव (डोंगा) नदीत बुडाल्याने तीनही मुलींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

या तीन मुलींपैकी सोनी मूकरू शेंडे ही विश्वाशांती विद्यालय भेंडाळा येथील विद्यार्थीनी असून, ती यावर्षी आठव्या वर्गात होती. या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे.