गडचिरोलीमध्ये सी-60 कमांडोंच्या चकमकीत 2 माओवाद्यांचा खात्मा
बातमी विदर्भ

गडचिरोलीमध्ये सी-60 कमांडोंच्या चकमकीत 2 माओवाद्यांचा खात्मा

गडचिरोली : गडचिरोलीमध्ये गेल्या काही दिवसांपासून माओवाद्यांनी डोके वर काढले आहे. सावरगावलगत सी-60 कमांडो आणि माओवाद्यांमध्ये चकमक उडाली. चकमकीत दोन माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गडचिरोली पोलिसांच्या सी सिक्स्टी पथकाच्या जवानाचे अभियान सुरू केले आहे. अभियान सुरू असताना माओवाद्यांनी अचानक पथकावर गोळीबार केला. त्याला जवानांनी जशास तसे प्रतिउत्तर दिले. अर्ध्या तासाच्या चकमकीनंतर दोन माओवाद्यांना ठार मारण्यात यश आले आहे. मृतकामध्ये एक पुरुष, एका महिला माओवाद्याचा समावेश आहे.

गडचिरोलीत माओवाद्यांनी पोलीस ठाण्यावर गोळीबार केल्याची घटना बुधवारी घडली. गडचिरोली जिल्ह्यातील जांबिया गट्टा पोलीस ठाण्यावर काही माओवाद्यांनी गोळीबार केला. माओवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला जवानांनी सुद्धा चोख प्रत्युत्तर दिलं आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास माओवाद्यांनी जांबिया गट्टा पोलीस ठाण्यावर हल्ला चढवला. मात्र, सतर्क असलेल्या जवानांनी या माओवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत परतवून लावलं आहे. मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार करुन जवानांना सापळ्यात अडकवण्याचा माओवाद्यांचा प्रयत्न जवानांच्या सतर्कतेमुळे फसला.