उद्धव ठाकरे आज १ वाजता जनतेशी फेसबुकद्वारे संवाद साधणार; लोकल सेवा सुरु करणार?
बातमी महाराष्ट्र

उद्धव ठाकरे आज १ वाजता जनतेशी फेसबुकद्वारे संवाद साधणार; लोकल सेवा सुरु करणार?

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्यानंतर राज्यसरकारने सर्वात प्रथम मुंबईची लाइफलाईन म्हणजे लोकल बंद केन्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असताना पुन्हा एकदा लोकल सुरु करण्याची मागणी सर्वसामान्य जनता करत आहे. अशातच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी १ वाजता राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, कोरोना कालावधीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सातत्याने फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला आहे. सध्या राज्यातील करोना परिस्थिती नियंत्रणा येत असल्याचं चित्र आहे. मात्र, पुढील काही दिवसात नाताळ आणि नवीन वर्ष सेलिब्रेशन असल्यानं गर्दी होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत राज्यातील कोरोना परिस्थिती, सर्वसामान्यांसाठी लोकल कधी सुरू होणार, नवीन वर्षाचं सेलिब्रेशन आदी मुद्दे चर्चेत असताना मुख्यमंत्री नेमकं काय बोलणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागलं आहे.

या काळात राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती देण्याबरोबरच राज्यातील जनतेला वारंवार आवाहनही मुख्यमंत्र्याकडून करण्यात आलं. त्याचबरोबर नवीन वर्षात सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याचे संकेत महापालिका प्रशासनानं दिले होते. त्यामुळे मुख्यमंत्री आज नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

तसेच, मुंबईतील कारशेडचा मुद्दा असो किंवा लाईट बिलात नागरिकांना न मिळालेली सवलत असो, यासह कोरोना आणि इतर बाबींसंदर्भातही उद्धव ठाकरे नागरिकांशी चर्चा करतील. दरम्यान, काँग्रेसच्या प्रमुख नेत्या सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून किमान समान कार्यक्रमाची आठवण करुन दिली आहे, त्यामुळे याबाबतही मुख्यमंत्री काय बोलतील, याकडेसर्वांचे लक्ष लागले आहे.