चांदणी चौकातील पूल २ दिवसांत तोडणार, नव्या पुलाच्या उद्घाटनाची तारीखही गडकरींनी सांगितली
पुणे बातमी

चांदणी चौकातील पूल २ दिवसांत तोडणार, नव्या पुलाच्या उद्घाटनाची तारीखही गडकरींनी सांगितली

पुणे : पुण्यात वाहतुकीसाठी अडचणीचा ठरणारा चांदणी चौकातला पूल पुढील दोन ते तीन दिवसात पाडण्यात येईल, अशी माहिती आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितली. चांदणी चौकातील हा पूल ३० मीटर लांबीचा आहे. पूल पाडण्यासाठी ट्विन टॉवर्सप्रमाणेच स्फोटकांचा वापर केला जाणार असल्याचंही गडकरी म्हणाले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कालपासून पुणे दौऱ्यावर आहेत. रात्री उशिरा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर गडकरींनी आज सकाळीच चांदणी चौकातील पुलाची पाहणी केली. पाहणीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

जूनपर्यंत नव्या पुलाचं उद्घाटन करणार करु

चांदणी चौक उड्डाणपुलाचे २०१९ मध्ये या कामाचे टेंडर निघाले होते. नऊ वैयक्तिक मालमत्ता अधिग्रहित करायच्या होत्या. त्यापैकी सात जागा अधिग्रहित झाल्यात. दोन जागा अधिग्रहित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्यात. सर्व वेळेत झालं तर जूनमधे उड्डाणपुलाचे उद्घाटन करू, असंही गडकरींनी सांगितलं.