राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा; पुणे मुंबईसह अनेक भागात गारपीट
बातमी महाराष्ट्र

राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा; पुणे मुंबईसह अनेक भागात गारपीट

आज राज्याच्या अनेक भागात जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. मुंबई, मुंबई-उपनगरे, पुणे, नाशिक, जालनासहीत मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. तर पुण्यात अनेक ठिकाणी गाराही पडल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई उपनगरांमधील नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबवलीसहीत अंबरनाथमध्येही मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडला. कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने राज्यात सर्वत्र किमान तापमानात वाढ होऊन गारवा घटल्याने राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मिळालेल्या माहितीनुसार, प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. हवामान खात्याचा अंदाज आज खरा ठरला. या अवकाळी पावसामुळे अंब्याच्या पिकाबरोबरच अनेक जिल्ह्यांमधील शेतमालाचं मोठं नुकसान झालं आहे. सध्या उत्तर मध्य महाराष्ट्रावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने वादळ सदृष्य परिस्थिती निर्माण झालीय.

स्कायमेट या खासगी हवामानशाळेचे उपाध्यक्ष महेश पळवट यांनी यासंदर्भातील ट्विट केलं आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये यामुळे गारपीट झाली असून उद्याही पाऊस आणि गारपीट सुरु राहील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. स्कायमेट या खासगी हवामानशाळेचे उपाध्यक्ष महेश पळवट यांनी यासंदर्भातील ट्विट केलं आहे. दरम्यान, १७ फेब्रुवारीला मराठवाडा आणि विदर्भासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. होईल असं सांगण्यात आलं होतं. विदर्भ, मराठवाडा, कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची हजेरी लावली आहे.

तर दुसरीकडे केरळ किनारपट्टी लगतच्या आग्नेय अरबी समुद्रापासून उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा कार्यरत झाला आहे. त्याची तीव्रता वाढून राज्यात पावसाला पोषक स्थिती निर्माण होईल. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस अधिक असेल. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.