कोरोना झाल्यावर घरच्यांना कंटाळलेल्या सासूने मारली सुनेला मिठी
देश बातमी

कोरोना झाल्यावर घरच्यांना कंटाळलेल्या सासूने मारली सुनेला मिठी

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून आपण अनेक धक्कदायक घटना पाहिल्या आहेत. अशात एक घटना समोर आली असून संसर्ग झाल्याने एक महिले वैतागून आपल्या सूनेला मिठी मारुन तिलाही कोरोना पॉझिटिव्ह केल्याचे तेलंगणमधील सोमरीपेटा गावात घडले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आपल्याला पुढील काही दिवस एकटं रहावं लागेल, कोणीही आपल्याला भेटायला येणार नाही या विचाराने ही महिला एवढी चिंतेत पडली की आयसोलेशन दरम्यानचा एकटेपणा टाळण्यासाठी तिने चक्क सुनेला मिठी मारली आणि सुनेलाही बाधित केलं.

कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या एका महिलेला घरीच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं. आयसोलेशनमध्ये असल्याने घरातील कोणताच सदस्य तिला भेटत नव्हता. या महिलेच्या संपर्कात आल्यास आपल्यालाही लागण होईल या भीतीने घरातील सर्वच सदस्य त्यांच्यापासून दूर राहू लागले. मात्र यामुळे ही महिला एवढी नाराज झाली की तिने जबरदस्तीने आपल्या सुनेची गळाभेट घेतली. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने या सुनेलाही कोरोनाची लागण झाली. या सुनेला कोरोनाची लागण झाल्यानंतर तिला सोमरीपेटा गावातून बाहेर काढण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. या महिलेच्या बहिणीने तिला मदत केली. बहिणीच्या मदतीने ही महिला राजन्ना सिरसिला जिल्ह्यातील थिम्मापुर गावातील आपल्या माहेरच्या घरामध्ये आयसोलेट झाली.