कोरोना काळात अमेरिकेची भारताला ५०० मिलियन डॉलरची मदत
बातमी विदेश

कोरोना काळात अमेरिकेची भारताला ५०० मिलियन डॉलरची मदत

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतात आरोग्य व्यवस्था कोलमडल्याचे चित्र उभे राहिले. ऑक्सिजनची मोठी कमतरता देशात जाणवली. अशात तब्बल ४० देशांनी भारताला कोरोना काळात मदतीचे साहित्य पाठवून मदत केली. अमेरिकेतर्फे ही मोठी मदत भारताला देण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अमेरिकेने आतापर्यंत भारताला कोरोनाशी लढण्यासाठी ५०० मिलियन अमेरिकन डॉलर (अंदाजे ३ लाख १९ हजार ५५० कोटी रुपये)ची मदत पुरविली आहे, अशी माहिती व्हाईट हाऊसने बुधवारी दिली. लवकरच इतर देशांनाही ८० लाख लसींचे वितरण करणार असल्याचे अमेरकिकडून सांगण्यात आले आहे. अमेरिकेने आजवर भारताला कोरोना काळात ५०० मिलियन अमेरिकन डॉलरहून अधिक मदत पुरविली आहे. यामध्ये अमेरिकन संघराज्य, राज्य सरकार, अमेरिकन कंपन्या, खासगी संस्था आणि अमेरिकन नागरिकांचे योगदान आहे, असे व्हाईट हाऊसच्या सचिव जेन पसाकी यांनी सांगितले आहे.

कोरोना जास्त प्रभाव असलेल्या दक्षिण आशियाई देशांना मदत देण्याचे काम आता सुरू असल्याचे बायडेन प्रशासनने सांगितले. भारतीय लोक ज्या परिस्थितीत होते त्याचा आमच्या मनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत आमच्याकडे या गोष्टींबद्दल अधिक साठा असेल, असे पसाकी म्हणाल्या.