‘गोपनीयता भंग होत असेल, तर WhatsApp डिलीट करु शकता : दिल्ली उच्च न्यायालय
देश बातमी

‘गोपनीयता भंग होत असेल, तर WhatsApp डिलीट करु शकता : दिल्ली उच्च न्यायालय

नवी दिल्ली : ”हे एक खासगी अ‍ॅप आहे, जर कोणाला गोपनीयतेबाबत जास्त चिंता वाटत असेल तर ते आपल्या फोनमधून व्हॉट्सअ‍ॅप डिलीट करू शकता. फक्त व्हॉट्सअ‍ॅपच नव्हे तर अन्य अ‍ॅप्सही युजरकडून त्याचा डेटा घेत असतात. एखाद्या मॅप किंवा ब्राउझरसोबतही डेटा शेअर केला जातो. गुगल मॅपही तुमचा डेटा स्टोअर करतं.” अशी टिप्पणी दिल्ली उच्च न्यायालयाने दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मेसेजिंग अ‍ॅप Whatsapp च्या नवीन प्रायव्हसी पॉलिसी युजरची गोपनीयता भंग होते, त्यामुळे सरकारने कारवाई करावी, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली होती. या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने हा निर्णय दिला. तसेच फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपविरोधात नोटीस जारी करण्यास नकार दिला.

तसेच, या प्रकरणाची २५ जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपकडून युजर्सच्या वैयक्तिक गोष्टी शेअर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावर प्रतिबंध घालणे आवश्यक आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीसंदर्भात सरकारने ठोस भूमिका घेतली पाहिजे, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली होती.

दरम्यान, व्हॉट्सअॅपने नुकतेच त्यांच्या गोपनीय धोरणांमध्ये (प्रायव्हसी पॉलिसी) बदल केले होते. तसेच ८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ते स्वीकारण्यासंबधी युजर्सला नोटीफिकेशन देखील पाठविण्यात आले होते. मात्र या पॉलिसीमुळे वाद वाढल्याने शेवटी कंपनीने ही पॉलिसी स्थगित केली आहे.