दूधवाल्यासोबत शरीरसंबंध ठेवण्यास सांगणाऱ्या पतीचा पत्नीनेच केला खून
देश बातमी

दूधवाल्यासोबत शरीरसंबंध ठेवण्यास सांगणाऱ्या पतीचा पत्नीनेच केला खून

नवी दिल्ली : एका महिलेचे आणि दूधवाल्याचे प्रेमसंबंध असल्याने महिलेने प्रियकराच्या मदतीने आपल्याच पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये घडली आहे. या महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करुन त्याच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र मृतदेह पूर्ण जाळण्याआधीच त्यांनी ज्या जंगलामध्ये मृतदेह जाळला तिथून पळ काढला. विचित्र गोष्ट म्हणजे नंतर ही महिलाच आपला पती बेपत्ता असल्याची तक्रार घेऊन पोलीस स्थानकामध्ये गेली. मात्र पोलिसांना या महिलेच्या वागणुकीसंदर्भात शंका आली आणि त्यांनी तिची चौकशी केल्यानंतर या महिलेने आपला गुन्हा कबुल केला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

हरिद्वारमधील पथरी पोलीस स्थानकामध्ये ११ मे रोजी अंजना नावाच्या महिलेने तिचा पती संजीव बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांनी अंजनाची चौकशी केली. त्यावेळी अंजनाने आपला गुन्हा कबुल केला. अंजनाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार पती संजीवच्या माध्यमातून तिची आणि शेजारच्या गावामध्ये दूध विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या शिवकुमारची ओळख करुन दिली. हळूहळू अंजना आणि शिवकुमार यांच्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र यासंदर्भात समजल्यानंतर संजीव या दोघांनाही त्याच्या उपस्थितीमध्ये शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडत असे. नंतर यावरुन तो त्यांना ब्लॅकमेल करुन बदनामी करण्याची धमकीही द्यायचा.

अंजनाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, संजीव तिला परपुरुषासोबत त्याच्या देखतच शरीरसंबंध ठेवण्यासाठी भाग पाडायचा. तसेच तो तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्यही करायचा. अनैसर्गिक पद्धतीने संबंध ठेवण्यासाठी संजीव माझ्यावर दबाव आणायचा असंही अंजनाने पोलिसांना सांगितलं आहे. एसपी प्रमेंद्र डोभाल यांनी या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करुन त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली आहे.