महाराष्ट्र हादरला ! नवऱ्याचे हात बांधून शारीरिक संबंध प्रस्थापित; नंतर गळा चिरुन हत्या
बातमी विदर्भ

महाराष्ट्र हादरला ! नवऱ्याचे हात बांधून शारीरिक संबंध प्रस्थापित; नंतर गळा चिरुन हत्या

नागपूर : नागपुरात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. दोन दिवासंपूर्वीच्या या हत्याकांडाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. तपासादरम्यान कौटुंबिक कलहातून अनेक महिन्यांपासून विभक्त राहणाऱ्या पत्नीनेच पतीची हत्या केल्याची माहिती समोर आली. पतीला खुर्चीला हात बांधून शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि नंतर गळा चिरुन हत्या केल्याची कबुली दिल्यानंतर पोलीसही चक्रावले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रजत संकुलच्या एका सदनिकेत दोन दिवसांपूर्वी ही हत्या झाली होती. आरोपी पत्नीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली. लक्ष्मण रामलाल मलिक असं ६५ वर्षीय मृत व्यक्तीचं नाव आहे. हत्येप्रकरणी ३१ वर्षीय पत्नी स्वाती नरेंद्र पाचपोहोरला अटक करण्यात आली आहे. लक्ष्मण स्वातीचा दुसरा पती होता. त्याच्यापासून तिला सहा वर्षांचा मुलगादेखील आहे. दोन वर्षांपासून तो तिच्यापासून वेगळा राहत होता. सोमवारी दुपारी स्वाती तिथे आली. त्यानंतर पतीला अश्लील चित्रफित दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यासाठी पतीचे हात खुर्चीला बांधले आणि चाकूने गळा कापला. यानंतर दुपारी ती रिक्षाने घरी आली होती.

पोलिसांनी याप्रकरणी शंभरहून अधिक लोकांची चौकशी केली. पण स्वातीच्या जबाबात सत्यता दिसत नसल्याने कसून चौकशी केली असता तिने हत्येची कबुली दिली. स्वातीने पतीपर्यंत पोहोचण्यासाठी वापरलेल्या ओला कॅबच्या चालकाचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. आरोपी स्वातीला तीन महिन्यांपूर्वी एक मुलगी झाली, त्यामुळे पती तिच्यावर संशय घेत होता. तिचे एका स्कूल बस चालकासोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती त्याला मिळाली होती. तेव्हापासून तो तिच्याकडे पहिल्या मुलाचा ताबा मागत होता. तिने त्याच्या निवृत्तीवेतन खात्याचे एटीएम कार्डही ठेवून घेतलं होतं. त्यातून या दोघांमध्ये वाद होता.