तर आत्महत्या करेन; राकेश टिकैत यांचे धक्कादायक विधान
देश बातमी

तर आत्महत्या करेन; राकेश टिकैत यांचे धक्कादायक विधान

नवी दिल्ली : जर कृषी कायदे सरकारने मागे घेतले नाहीत तर मी आत्महत्या करेन, असे धक्कादायक विधान भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी केले आहे. त्यांनी केंद्र सरकारला एक प्रकारे इशाराच दिला आहे. देशातील शेतकऱ्यांवर अत्याचार होत असून त्यांना उद्ध्वस्त करण्याचा कट रचला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राकेश टिकैत यांच्यावर युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण त्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्यास नकार दिला. गाजीपूर बॉर्डरवरील आंदोलनस्थळावरुन शेतकऱ्यांना संबोधित करताना ते म्हणाले, मी आत्मसमर्पण करणार नाही. भाजप याद्वारे काही वेगळंच दाखवू पाहत आहे. लाल किल्ल्यावरील हिंसाचारासाठी जे लोक जबाबदार आहेत त्यांचे कॉल रेकॉर्ड समोर आले पाहिजेत. दीप सिंधूबाबत लोकांना माहिती व्हायला हवी. याप्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून चौकशी व्हायला हवी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

सरकारने आमची लाईट-पाण्याची सुविधा तोडली आहे. जर गरज पडली तर गावांमधून आणखी लोक येतील. आम्ही गावांतून पाण्याचे टँकर मागवू. जोपर्यंत सरकार चर्चा करत नाही आम्ही याच ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत, असेही टिकैत यांनी यावेळी सांगितले आहे.