देश बातमी

महिला पोलिसांवर तिघांचा बलात्कार; रेकॉर्ड केला व्हिडिओ

नवी दिल्ली : महिला पोलिस कॉन्स्टेबलवनर तीन जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशच्या नीमच जिल्ह्यात घडली आहे. आरोपींनी या कृत्याचा व्हिडिओ शूट केला आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि त्याच्या आईला अटक करण्यात आली आहे, तर इतर तिघे फरार आहेत, असे महिला पोलीस ठाण्याच्या प्रभारी अनुराधा गिरवाल यांनी सांगितले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पवनने या वर्षाच्या सुरुवातीला फेसबुकवर महिला कॉन्स्टेबलशी मैत्री केली आणि तिच्याशी व्हॉट्सअॅपवर चॅटिंग सुरू केली. त्यानंतर ते लवकरच प्रत्यक्ष आयुष्यात भेटू लागले. आरोपी पवन हा नीमचमधील मनसा शहरातील रहिवासी असून पीडितेला भेटायला इंदूरला गेला होता. नंतर पवनने पीडितेला त्याचा भाऊ धीरेंद्रच्या वाढदिवसासाठी मनसा येथे आमंत्रित केले.

पवनच्या घरी, त्याचा भाऊ धीरेंद्र आणि विजय यांनी महिला कॉन्स्टेबलवर बलात्कार केला. या कृत्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेने पवन घरी आल्यावर त्याला घडलेला प्रकार सांगितला तेव्हा त्यानेही तिच्यावर बलात्कार केला, असं पीडितेनं जबाबात म्हटलं आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पवन आणि त्याच्या आईला अटक केली आहे. तसेच धीरेंद्र, विजय आणि त्यांच्या काकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.