धक्कादायक ! कोल्हापूरात सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट होऊन महिलेचा मृत्यू
पश्चिम महाराष्ट्र बातमी

धक्कादायक ! कोल्हापूरात सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट होऊन महिलेचा मृत्यू

कोल्हापूर : सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट झाल्याने महिलेचा दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापुर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील बोरवडे भागात घडली आहे. एकीकडे कोरोनामुळे सॅनिटायझर लोकांच्या आयुष्याचा नित्याचा भाग होत असतानाच दुसरीकडे या घटनेमुळे स्थानिक लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सुनीता काशीद आपल्या घरातील कचरा पेटवत होत्या. यावेळी त्याच्यामध्ये सॅनिटायझरची बाटलीदेखील होती. त्यात शिल्लक असणाऱ्या सॅनिटायझरमुळे बाटलीचा स्फोट झाला आणि सुनीता काशीद आगीत होरपळल्या. उपचारासाठी त्यांना कोल्हापुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून सॅनिटायझर आणि मास्क ही लोकांची गरज झाली आहे. त्याचबरोबर नागरिकांना सॅनिटयझरने सातत्याने हात धुण्याचे आवाहनही करण्यात येत आहे. परंतु आता या दुर्घटनेमुळे लोकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे.