मराठवाडा हादरला ! कोरोनाने पतीचा मृत्यू झाल्याचं कळताच तीन वर्षाच्या मुलासह पत्नीची आत्महत्या
बातमी मराठवाडा

मराठवाडा हादरला ! कोरोनाने पतीचा मृत्यू झाल्याचं कळताच तीन वर्षाच्या मुलासह पत्नीची आत्महत्या

नांदेड : कोरोनामुळे परिस्थिती गंभीर बनली असून सगळीकडे भितीदायक वातावरण बनलं आहे. अशाच एका घटनेमुळे मराठवाडा हादरला आहे. पतीचं कोरोनामुळे निधन झाल्याची माहिती मिळताच पत्नीने आपल्या तीन वर्षांच्या मुलासह आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात ही घटना घडली आहे. महिलेने दोन्ही मुलींना घरी ठेवून तीन वर्षांच्या मुलासह तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. आई-वडिलांविना मुली पोरक्या झाल्या आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर गदम (वय 40) हे मजुरी करत होते. गदाम हे लोहा शहरातील बालाजी मंदिराच्या पाठीमागे पत्नी दोन मुली व एक मुलासह राहत होते. शंकर गदम यांचा कोरोना अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर लोहा येथील रुग्णालयात उपचार सुरू होते, उपचारादरम्‍यान गदम यांचा मुत्यू झाला. ही घटना समजली असता त्यांच्या पत्नीला मोठा धक्का बसला.

मंगळवारी मध्यरात्री लहान मुलाला सोबत घेऊन त्यांनी शहराजवळ असलेल्या सुनेगाव तलावात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी लोहा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक करे हे करीत आहेत.