भयानक ! महिलेवर पतीसमोरच सामूहिक भररस्त्यात बलात्कार
देश बातमी

भयानक ! महिलेवर पतीसमोरच सामूहिक भररस्त्यात बलात्कार

आग्रा : उत्तर प्रदेशच्या आग्रा येथे एक भयानक घटना घडली असून महिलेवर तिच्या पतीसमोरच भररस्त्यात सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पीडित महिलेने याबाबत एत्माद्दौला पोलीस स्थानकात तीन जणांविरोधात तक्रार केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सोमवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पतीसोबत गाडीवरुन माहेरी जात असताना ही घटना घडल्याचं वृत्त आज तकने दिलं आहे. महिलेचं माहेर एत्माद्दौला परिसरात तर सासर एत्मादपूरमध्ये आहे. पीडितेने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास पतीसोबत बाइकवरुन माहेरी जात असताना तीन तरुणांनी रस्ता अडवला, मारहाण केली त्यानंतर बळजबरीने आम्हाला रस्त्यालगतच्या झाडा-झुडपांमध्ये घेऊन गेले. तिथे पतीसमोरच तिघांनी बलात्कार केला.

एवढंच नाही तर घटनेचं मोबाईलमध्ये चित्रीकरण देखील केलं. शिवाय 10 हजार रुपये, सोन्याचे कानातले आणि सामान लुटून फरार झाले. बलात्काराच्या घटनेनंतर मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पीडित दांम्पत्याने पोलिस स्थानकात जाऊन तक्रार केली. पोलीस अधिक्षक आर. ए. सत्यजीत गुप्ता यांनी सांगितलं की पीडितेच्या तक्रारीनुसार, सामूहिक बलात्कार, लुटमार आणि जीवे मारण्याची धमकीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेला वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात आले असून आरोपींना अटक करण्यासाठी पथक स्थापन करण्यात आलं आहे.