धक्कादायक ! संसदेतच महिलेवर बलात्कार; पंतप्रधानांकडून माफी
बातमी विदेश

धक्कादायक ! संसदेतच महिलेवर बलात्कार; पंतप्रधानांकडून माफी

मेलबर्न : संसदेतच आपल्यावर बलात्कार झाल्याचा गंभीर आरोप ऑस्ट्रेलियामधील एका महिलेने केला आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी महिलेची माफी मागितली असून सरकारी कामकाज कशा पद्दतीने चालतं यासंबधी चौकशी करण्याचं आश्वासन दिलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पीडित महिलेच्या आरोपानुसार, मार्च २०१९ मध्ये संरक्षण मंत्र्यांच्या कार्यालयात तिच्यावर बलात्कार करण्यात आला. बलात्कार करणारा आरोपीदेखील सरकारी पक्षासाठी काम करतो असं महिलेने सांगितलं आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

एप्रिल महिन्याच्या सुरुवातील आपण पोलिसांसोबत याबाबतीत चर्चा केली होती. पण करिअरची चिंता असल्याने कोणतीही तक्रार दाखल केली नाही. अशी माहिती या महिलेने स्थानिक प्रसारमध्यमांना दिली आहे. पोलिसांनीही एप्रिल २०१९ मध्ये तक्रारदार महिलेसोबत संभाषण झाल्याची आणि तिने तक्रार दाखल न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे.