बाबा रामदेव अन् योगी आदित्यनाथ थेट अभ्यासक्रमात
देश बातमी

बाबा रामदेव अन् योगी आदित्यनाथ थेट अभ्यासक्रमात

नवी दिल्ली : योगगुरु बाबा रामदेव यांना आता योगातील तत्वज्ञ मानून त्यांचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा देखील आता अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. मेरठच्या चौधरी चरण सिंह विद्यापिठात आता विद्यार्थ्यी योगी आदित्यानाथ आणि रामदेब बाबा यांच्या विषयी अभ्यास करणार आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाने यांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. योगी आदित्यनाथ आणि रामदेव बाबा दोघांव्यतिरिक्त बशीर बद्र, कुवर बैचेन, जग्गी वासुदेव यांचाही समावेश आहे. विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाने नविन अभ्यासक्रमाला मान्यता दिली आहे. नविन अभ्यासक्रमात योगी आदित्यनाथ यांनी लिहिलेल्या हठयोग या पुस्तकाबद्दल शिकवण्यात येणार आहे. योगींच्या पुस्तकाचे प्रकाशन गोरखनाथ ट्रस्टने केलं आहे. योगी यांचे विचार विद्यार्थ्यांना वेगळा रस्ता दाखवतील असं अभ्यास मंडळाचे म्हणणे आहे. त्यांच्या विचारांनी विद्यार्थ्यांना सक्षम बनण्याची संधी मिळेल.

अभ्यास मंडळाने रामदेव यांच्या योगाभ्यास आणि योग चिकित्सा रहस्य या पुस्तकांचा देखील अभ्यासक्रमात समावेश केला आहे. या पुस्तकाच्या कलाशाखेच्या अभ्यासक्रमात समावेश केला आहे. कलाशोखेच्या तत्वज्ञानच्या विषयात आता प्रॅक्टिकल आणि थेअरी अभ्यास असणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२१- २२नुसार अभ्यासक्रम मंडळाच्या झालेल्या बैठकीत नविन अभ्यासावर शिक्कामोर्तब केलं आहे. या अभ्यासक्रमाचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे अशी माहिती डॉ. डीन. सिंह यांनी दिली.