सात दिवसांत रुग्ण होणार निगेटिव्ह; झायडस कॅडिलाच्या विराफीनला भारतात परवानगी
देश बातमी

सात दिवसांत रुग्ण होणार निगेटिव्ह; झायडस कॅडिलाच्या विराफीनला भारतात परवानगी

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशात एक दिलासादायक बातमी समोर आली असून झायडस कॅडिला या कंपनीचं विरॅफिन हे औषध कोरोनावरील उपचारांसाठी म्हणून देशात वितरीत करण्यासाठी डीसीजीआय अर्थात ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं मान्यता दिली आहे. येत्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारांसाठी हे औषध डॉक्टरांच्या परवानगीने वापरता येणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या औषधाच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निकाल सकारात्मक असून औषध दिल्यानंतर ७व्या दिवशी कोरोनाबाधित व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह येत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. झायडसनं जाहीर केलेल्या निकालांनुसार, हे औषध यशस्वी ठरण्याचं प्रमाण तब्बल ९१.१५ टक्के आहे. अर्थात, हे औषध दिलेल्या कोरोनाबाधितांपैकी ९१.१५ टक्के रुग्णांचे अहवाल हे ७ दिवसांमध्ये निगेटिव्ह आले आहेत. विराफीनचा एकच डोस द्यावा लागत असून तो इतर आजारांवरील इंजेक्शन्सप्रमाणेच त्वचेच्या खाली द्यावा लागत असल्याचं देखील कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, विराफीन दिल्यानंतर कोविड रुग्ण वेगाने बरे होण्यास मदत होत असल्याचं देखील कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. रुग्ण लवकर बरे होत असल्यामुळे त्यांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज कमी होते. तसेच, रुग्णाला रेस्पिरेटरी डिस्ट्रेस देखील कमी होतो, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. जर रुग्णाला सुरुवातीच्या काळातच विराफीन दिलं, तर कोरोना विषाणूचा प्रभाव लक्षणीयरित्या कमी होतो. यामुळे रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते.