भारताचा दणदणीत विजय; मालिकेत बरोबरी
फोटो

भारताचा दणदणीत विजय; मालिकेत बरोबरी

चेन्नई : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात चेन्नईमध्ये सुरू असलेली दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवला असून ४ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. या सामन्यात भारतीय संघाने 317 रननं दणदणीत विजय मिळवला आहे. रोहित शर्मा आणि आर. अश्विनची शतके आणि भारतीय स्पिनर्सची कमाल हे भारताच्या या विजयाचं मुख्य वैशिष्ट्य ठरले. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल गाठण्यासाठी भारताला ही टेस्ट जिंकणे आवश्यक होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारतीय गोलंदाजांनी चौथ्या दिवसावर अगदी सुरुवातीपासून वर्चस्व गाजवलं. इंग्लंडनं 3 आऊट 53 या धावसंख्येवरुन पुढं खेळण्यास सुरुवात केली. आर. अश्विनच्या बॉलिंगवर डॅन लॉरेन्स लगेच बाद झाला. लॉरेन्स बाद झाल्यानंतर जो रुटनं बेन स्टोक्सच्या मदतीनं प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. बेन स्टोक्सला आर. अश्विननं पुन्हा एकदा जाळ्यात अडकवलं. स्टोक्सला अश्विननं दहाव्यांदा आऊट केलं आहे. लंचपूर्वी कुलदीप यादवनं बेन फोक्सला आऊट करत त्याची या टेस्टमधील पहिली विकेट घेतली.

तिसऱ्या दिवशी लकी ठरलेला रुट पहिल्या सेशनमध्ये उभा होता. लंचनंतर तो फार टिकला नाही. अक्षर पटेलनं सलग दुसऱ्यांदा रुटला आऊट करत इंग्लंडच्या इनिंग लांबवण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का दिला. रुट आऊट झाल्यानंतर इंग्लंची इनिंग संपण्याची औपचारिकता बाकी होती. मोईन अलीनं पाच सिक्स मारत पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. कुलदीप यादवनं मोईन अलीला आऊट करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. सामानावीराचा किताब हा रविचंद्रन अश्विनला देण्यात आला.