पुणे : पुण्यात मनसेच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त खास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली. राज ठाकरे म्हणाले की, एकमेकांमध्ये वाद लावण्याचे प्रयत्न महाराष्ट्रात सध्या सुरू आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून टाळकी फिरवण्याचे काम सुरू आहे. गुढीपाडव्याला दांडपट्टाच फिरवणार आहे. राजकारण्यांनी महाराष्ट्रात चिखल केलाय. महिला दिन हाच सर्वात मोठा दिवस आहे. महिला दिन हा जिजाऊंच्या नावाने ओळखला पाहिजे. राज्यात राजकिय फेरीवाले आलेत. राजकिय फेरीवाले आपल्या पक्षात नाहीत.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
पुढे राज ठाकरे म्हणाले की, संघटना मजबूत करणे गरजेचे आहे. पक्षातील प्रत्येकाचे काम दर १५ दिवसांनंतर तपासले जाणार. कामात जर दिरंगाई केली तर पदावर ठेवणार नाही, असा सज्जन दमच राज ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना दिलाय. कामचुकार कार्यकर्त्यांना पदावर ठेवणार नाही, असा थेट इशारा राज ठाकरे यांनी दिलाय. यासोबतच त्यांनी म्हटले की, देशातील एकही नदी स्वच्छ नाहीये. परदेशातील नद्या बघा सर्वांनी.
कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची राज ठाकरे यांनी खिल्ली उडवली आहे. गंगा स्वच्छ होणार हे मी राजीव गांधी यांच्यापासून ऐकत आलो आहे. बाळा नांदगावकर यांनी कुंभमेळ्यातून गंगेचे पाणी माझ्यासाठी आणले होते. मी त्यांना म्हटले हड मी ते पिणार नाहीये. यावेळी त्यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी सर्व कार्यकर्त्यांनी शिवतीर्थावर यावे असेही म्हटले आहे. ११ मार्चला सर्वांना जबाबदाऱ्या देणार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. यावेळी ते म्हणाले की, काही गोष्टी मी आताच स्पष्ट बोलू शकत नाही आणि मी बोलणारही नाही.