मुंबई : “मी मंत्री महोदयांना काही सूचना करणार आहे. पण एका गोष्टीची खंतही आहे. ही खंत व्यक्त करताना माझी मोठी अडचण होते. मी काही बोललो की, टीव्ही चॅनलवाले बोलतात मंत्री केलं नाही म्हणून नाराज आहेत. खरंतर ते गाणं मला आवडतं. कारण आमचे आवडते नेते नितीन गडकरी, ज्यांच्यावर मी मनापासून प्रेम करतो, ते नेहमी हे मस्त गाणं गुणगुणतात. तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूं मैं तेरे मासूम सवालों से परेशान हूं मैं”, असं गाणं भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात बोलून दाखवलं.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
“कधीकधी पत्रकार विचारतात की तुम्ही नाराज आहात का? तेरे मासूम सवालों से परेशान हूं मैं. शेवटी आम्ही या सभागृहात कोणत्या पदावर जाण्यासाठी आलो नाहीत. निवडणूक जिंकणं हे आमचं लक्ष्य नाही. आमच्या मतदारसंघाच्या नागरिकांचं मन जिंकणं यासाठी आम्ही मुद्दे मांडतो”, असं सुधीर मुनंगटीवार म्हणाले.