शिंदेंवरील कवितेनंतर कुणाल कामराला देवेंद्र फडणवीसांनी फटकारले, म्हणाले
राजकारण

शिंदेंवरील कवितेनंतर कुणाल कामराला देवेंद्र फडणवीसांनी फटकारले, म्हणाले

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) याने कवितेतून टीका केली. हेच नाही तर थेट गद्दार देखील म्हणण्यात आले. कुणाल कामराच्या या कवितेनंतर राज्याचे राजकारण तापल्याचे बघायला मिळतंय. कुणाल कामराच्या विरोधात शिवसैनिक हे आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. कुणाल कामराच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. जोरदार टीका केली जात आहे. कुणाल कामराने ज्या हॉटेलमध्ये हा कार्यक्रम घेतला तिथेही शिवसैनिकांनी मोठी तोडफोड केल्याचे बघायला मिळतंय. शिवसैनिकांनी कुणाल कामराला थेट माफीसाठी अल्टीमेटम दिले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शिवसैनिक आक्रमक भूमिका घेत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादावर भाष्य केले. देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की, कामराला हे माहिती पाहिजे की, महाराष्ट्राच्या जनतेने २०२४ साली कोण गद्दार हे दाखवून दिले आहे. कोणाकडे बाळासाहेब ठाकरे यांची विरासत गेली हे जनतेने ठरवले आहे. त्यामुळे अशाप्रकारची खालच्या दर्जाची कॉमेडी करून आणि राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री, राज्याचे वरिष्ठ नेते ज्यांच्याबद्दल राज्यातील जनतेला आदर आहे.

त्यांच्याबद्दल अशाप्रकारचा अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नाही. हे अत्यंत चुकीचे आहे. तुम्ही जरूर कॉमेडी करा, व्यंग करा पण जर अपमानित करण्याचे काम जर कोणी करेल तर हे सहन केले जाणार नाही, असा थेट इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. ते पुढे म्हणाले की, हे अतिशय चुकीचे आहे. कामरांनी माफी मागितली पाहिजे. ते जे संविधानाचे पुस्तक दाखवत आहेत ते त्यांनी जर संविधान वाचले असेल तर किंवा त्यांना संविधानाची माहिती असेल तर संविधानानेच सांगितले आहे.