गुवाहाटीच्या दौऱ्यात तब्बल 11 जणांनी अनुपस्थिती; शिंदे गटात नाराजी तर नाही ना? कारणं आली समोर
राजकारण

गुवाहाटीच्या दौऱ्यात तब्बल 11 जणांनी अनुपस्थिती; शिंदे गटात नाराजी तर नाही ना? कारणं आली समोर

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार आणि खासदार कुटुंबासह आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली गुवाहाटीला गेले आहेत. गुवाहाटीमधील प्रसिद्ध कामाख्या देवीच्या दर्शनासाठी हे सगळे याठिकाणी गेले आहेत. त्याठिकाणी काल सर्वांनी कामाख्या देवीचे दर्शनही घेतले. मात्र, या गुवाहाटीच्या दौऱ्यात तब्बल 4 मंत्री, चार आमदार आणि तीन खासदारांनी दांडी मारली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटात नाराजी तर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गुवाहाटीला कोणाकोणाची दांडी?

कृषी मंत्री अब्दुल सत्तार, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, मंत्री गुलाबराव पाटील हे गुवाहाटीला गेलेले नाहीत. अब्दुल सत्तार यांनी कृषी प्रदर्शन, तानाजी सावंत यांनी आरोग्य शिबिर, तसेच मंत्री गुलाबराव पाटील यांनी दूध संघ निवडणूक आणि शंभूराज देसाई यांनी लग्नकार्याचे कारण देत गुवाहटीच्या दौऱ्याला अनुपस्थिती दर्शवली.

तसेच आमदार संजय गायकवाड, महेश शिंदे, चंद्रकांत पाटील, अनिल बाबर, खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, श्रीरंग बारणे यांनीही वैयक्तिक कारण देत अनुपस्थिती दर्शवली.