राजकारण

पंजाबच्या नव्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री चरणजीत चन्नींसोबत नव्या ६जणांना संधी

चंदीगढ : पंजबाचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री चरणजीस सिंग यांनी आपल्या मंत्रिमंडळात ६ नव्या मंत्र्यांचा समावेश केला आहे. एकूण १५ मंत्र्यांचं हे मंत्रिमंडळ असणार आहे. यातून काही आधीच्या मंत्र्यांना डच्चू देखील देण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत राजकीय घडामोडी आणि पंजाबमधील राजकीय वर्तुळातील गणितं मंत्रिमंडळाच्या चेहऱ्यांमधून दिसून येत असल्याचं सांगितलं जात आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पंजाबच्या मंत्रिमंडळात आज ब्रह्म मोहिंद्रा, मनप्रीत सिंग बादल, त्रिप्त राजिंदर सिंग बाजवा, सुखबिंदर सिंग सरकारिया, राणा गुरजीत सिंग अरुणा चौधरी, रझिया सुलताना, भारत भूषण अशू, विजय इंदर सिंगला, रणदीप सिंग नाभा, राद कुमार वेर्का, संकत सिंग गिलझियान, परगत सिंग, अमरिंदर सिंग राजा वारिंग, गुरकिरत सिंग कोटिल या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे.