चित्र वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावर एसीबीकडून गुन्हा दाखल
राजकारण

चित्र वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावर एसीबीकडून गुन्हा दाखल

मुंबई : बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. या पूर्वी किशोर वाघ यांना याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आता त्यांची या प्रकरणात चौकशी होणार आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी पती किशोर वाघ यांच्याविरोधात एसीबीने गुन्हा दाखल केला आहे. आता पोलीस या प्रकरणी अधिक तपास करणार आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांना २०१६ मध्ये लाच मागितल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सुरू होता. आता या प्रकरणाच्या तपासादरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आता गुन्हा दाखल केला आहे. किशोर वाघ यांच्या विविध शहरात असलेल्या मालमत्तांपैकी ९० टक्के मालमत्ता ही बेहिशेबी मालमत्ता असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, मला आणि माझ्या पतीला याबाबत कुठलीही माहिती न देता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मला माझी बाजू मांडण्याची संधी देखील दिली गेली नाही. हा सुडबुद्धीने केलेला प्रकार आहे. कायदेशीर लढा देण्यासाठी मी तयार आहे, असं चित्रा वाघ यांनी सांगितलं आहे.

या कारवाईवरून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ”चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतल्याने राजकीय सुडबुद्धीने कारवाई करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारला त्यांच्याविरोधात बोललेले आवडत नाही. असे जर कुणी काही बोलले तर त्यांची जुनी प्रकरणे बाहेर काढली जातात. या प्रकरणात भाजपा हा चित्रा वाघ यांच्यासोबत आहे, असेही दरेकर यांनी सांगितले.

नक्की काय आहे प्रकरण?
चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता. परळच्या महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालयाशी संबंधित एका प्रकरणात किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा तपास सुरु होता. या प्रकरणात आता गुन्हा दाखल केला आहे. एसीबीकडून सांगण्यात आलं आहे की, अनेक दिवसांपासून तपास सुरु होता. त्यामुळं आता काही माहितीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर वाघ यांच्याकडे असलेल्या 90 टक्के मालमत्तेचा हिशोब नाही, असं एसीबीचं म्हणणं आहे.