पंढरपूरातून पार्थ पवारांना उमेदवारी देण्याबाबत अजित पवारांची पहिली प्रतिक्रीया; म्हणाले…
राजकारण

पंढरपूरातून पार्थ पवारांना उमेदवारी देण्याबाबत अजित पवारांची पहिली प्रतिक्रीया; म्हणाले…

पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार भारत नाना भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रीया दिली आहे भूमिका स्पष्ट केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पार्थ पवार यांच्या उमेदवारीचे वृत्त पूर्णपणे निराधार असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. या मतदारसंघात उमेदवारी देताना स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे मत विचारात घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे तथ्यहीन वृत्त माध्यमांनी थांबवावे, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार ठरविण्याचा निर्णय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व उमेदवार निवड समितीच्या माध्यमातून घेण्यात येईल. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून ही पहिलीच विधानसभा पोटनिवडणूक असून महाविकास आघाडीचा उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होईल असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

दरम्यान, भारत नाना भालकेंचे निधन हा आमच्यासाठी मोठा धक्का असून स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी विचारविनिमय करुनच या पोटनिवडणुकीसाठी स्थानिक उमेदवार देण्यास प्राधान्य असणार असल्याचेही पवार यांनी म्हटले.