गोपीचंद पडळकरांना अजित पवारांचे जोरदार प्रत्युत्तर
राजकारण

गोपीचंद पडळकरांना अजित पवारांचे जोरदार प्रत्युत्तर

मुंबई : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापुरात फेकण्यात आलेला दगड ही बाब चांगलीच चर्चेत आहे. खुद्द गोपीचंद पडळकर यांनी यासाठी थेट राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्षाध्यक्ष शरद पवारांवर आरोप केले. तसेच, गोळ्या घातल्या तरी माघार घेणार नाही, असं थेट आव्हानच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिलं. या पार्श्वभूमीवर पक्षाकडून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून कुणी जर स्वत:च गाडीवर दगड मारून घेत असेल तर काय बोलायचं? असे म्हटले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पवार पुढे म्हणाले, ‘काय आहे त्या कार्यकर्त्याचं नाव? मीही फोटो बघितला. गाडीची काच फुटलेली. तो राष्ट्रवादीनीच मारला कशावरून? ते आमचे विरोधकच आहे. ते दुसऱ्या कुणाचं नाव घेणार? ते भाजपाचं नाव तर घेऊ शतकत नाहीत. कुणी स्वत:च कट रचून आपल्या गाडीवर दगड मारून घेतला असेल तर काय सांगता येतं. मागे सोलापूरच्या घाटात एका मोठ्या राजकीय व्यक्तीच्या गाडीवर स्फोट वगैरे झाला. त्यातून राजकारण झालं. काहीजण सहानुभूती मिळवण्याचा देखील प्रयत्न करत असतात’.

दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवार यांनी विचारांची लढाई विचारानेच करायला हवी, अशी भूमिका मांडली. मी नाशिकमध्ये काल सांगितलं. व्यक्ती कुणीही असू द्या, आपल्या पक्षाचं काम करत असताना कायदा कुणीही हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. विचारांची लढाई विचारानेच करावी, असं ते म्हणाले.