जास्त खोलात जाऊ नका, नाहीतर कुणाच्या किती बायका आणि कुणी किती मुलं, सांगू का?
राजकारण

जास्त खोलात जाऊ नका, नाहीतर कुणाच्या किती बायका आणि कुणी किती मुलं, सांगू का?

पुणे : ”आता जर इतरांच्या भानगडी बाहेर काढल्या तर विषय खूप लांब जाईल, कशाला खोलात जाण्यास सांगताय’, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपाच्या नेत्यांना इशारा दिला आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झालेली तक्रार त्या महिलेनेच मागे घेतली आहे. मात्र भाजपवाले दबावामुळे तक्रार मागे घेतली अशी टीका करत आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावर, अजित पवार यांनी भाजपा नेत्यांची खरडपट्टीच काढली आहे. पुणे जिल्हा नियोजनच्या आढावा बैठकीला पवार आले होते. तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा इशारा दिला. धनंजय मुंडे यांनी करुणा शर्माबाबत जे सांगायचं होतं ते त्यांनी जाहीरपणे सांगितले आहे. विरोधकांनी उगीच फाटे फोडू नये. कुणी काय काय लपवाछपवी केली, कुणाचे लग्न झाले होते, कुणाला किती मुलं होती. लग्न झालं होतं की नाही झालं, कुणाच्या किती बायका आणि कुणी किती मुलं लपवली आहेत हे काय आम्हाला ठाऊक नाही का?, असा इशारा दिला.

त्याचबरोबर यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकारने जनतेच्या मागण्या लक्षात घेऊन निर्णय घ्यावेत असेही म्हंटले आहे. ओबीसी जनगणना, कृषी कायद्यांवर त्यांनी निर्णय घ्यावा. आम्ही राज्यात कृषी कायदे लागू करणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. तसेच, पंकजा मुंडे यांनी केलेल्या जातीनिहाय जनगणनेच्या प्रश्नावरदेखील पवारांनी भाष्य केले. जनगणना करायची की नाही हा निर्णय केंद्र सरकारचा आहे. तो लोकसभेचा अधिकार असून केंद्राने याबाबत निर्णय घ्यावा. लोकसभेतच ही मागणी झाली होती आणि ही खूप जुनी मागणी असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.