राजकारण

परत जाईन म्हणायला त्यांना कोणी पुणेकरांनी बोलवलंही नव्हतं; पवारांचा पाटलांना टोला

पुणे : “एक म्हणतो पुन्हा येईन तर दुसरा म्हणतो परत जाईन, परत जाईन म्हणायला त्यांना कोणी पुणेकरांनी बोलवालंही नव्हतं, असा खोचक टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. तसेच, चंद्रकांतदादांना पुणेकरांनी बोलावलंच नव्हतं, असा टोमणा अजित पवारांनी लगावला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पुणे विधान भवन येथे अजित पवारांच्या हस्ते चार रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आलं. यानंतर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी साधलेल्या संवादात जोरदार राजकीय फटकेबाजी केली. ‘असा टोला अजित पवार यांनी लगावला. “पुन्हा येईन, परत जाईन’ अशी भाषा करणाऱ्यांना जनतेने बोलावलंच नाही, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं, चंद्रकांतदादांना पुणेकरांनी बोलावलंच नव्हतं.

”निवडणुकीत कोणी कुठे उभे राहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण एक वर्ष होण्याआधीच परत जाण्याची भाषा करु लागले. बरं चंद्रकांत दादा पुण्यात आलेच आहेत तर मग एका वर्षातच परत जाण्याची भाषा का? असा सवाल करताना कोथरुडकरांनी त्यांना पाच वर्षासाठी निवडून दिलंय. उद्या जर कोथरुडकर काही काम घेऊन गेले तर मी परत जाणार आहे, असं चंद्रकांतदादा सांगणार आहेत का?”, अशी टोलेबाजी अजित पवार यांनी केली.

तसेच यावेळी अजित पवारांनी शेतकरी आंदोलनावरून भाजपावर निशाणा साधला. “आम्ही अजिबात सतावत नाही. त्यांनी त्यांचं काम करावं आणि आमचं आम्ही करतो. जर यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतले आहेत तर तो रस्त्यावर का आला आहे. इतक्या थंडीत आंदोलन का सुरु आहे याचं आत्मपरीक्षण करावं. इथं बैलगाडीत बसून फोटो काढले. दिल्लीत महाराष्ट्रातूनही शेतकरी गेले आहेत,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

 

Leave a Reply

Your email address will not be published.