अन् सुनेत्रा पवार गाऊ लागल्या; तेरे मेरे सपने अब एक रंग है’…
राजकारण

अन् सुनेत्रा पवार गाऊ लागल्या; तेरे मेरे सपने अब एक रंग है’…

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आपल्या सोशल मिडीयावरून नेहमीच काहीना काही शेअर करत असतात. सण- उत्सव किंवा मग कोणताही समारंभ, शरद पवार यांच्या कुटुंबाचा आनंदाचे क्षण त्या नेहमीच शेअर करत असतात आणि त्यांच्या चाहत्यांनाही त्यांच्या आनंदात सामील करून घेत असतात.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला असून यात ज्यामध्ये पवार कुटुंबामध्ये संगीत मैफल रंगल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवार यांची बहीण, नीता पाटील यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त एका खास समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या सोशल मीडिया पेजवरुन या क्षणांचा व्हिडीओ शेअर केला.

https://www.facebook.com/watch/?v=222544396143866

यात लक्ष वेधत आहेत त्या म्हणजे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार. कुटुंबीयांच्या साथीनं त्या ‘तेरे मेरे सपने…. ‘ हे गाणं गाताना दिसत आहेत. सुप्रिया सुळे यांनी केलेल्या या पोस्टमध्ये त्यांच्या कुटुंबातील मंडळी अतिशय मनमुरादपणे या क्षणांमध्ये रमले असून त्यांच्यात गाण्यांची सुरेल मैफलही रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

जुन्या काळातील वेगवेगळी प्रसिद्ध गाणी पवार कुटुंबातील सदस्यांनी गायली. किशोर कुमारांचं “फूलों की रंग से… लेना होगा जनम हमे कई कई बार”, मोहम्मद रफींचं “तेरे मेरे सपने अब एक रंग है अशी अनेक गाणी यावेळी सादर झाली. सुप्रिया सुळेंनी आग्रह धरल्याने वहिनी सुनेत्रा पवार यांनी ‘लाख मना ले दुनिया…साथ न ये छुटेगा, आके मेरे हाथों मे हाथ न ये छुटेगा.. ओ मेरे जीवनसाथी… तेरे मेरे सपने अब एक रंग है’ असं गात उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं.

https://www.facebook.com/watch/?v=193127709152189

शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि आता रोहित पवार… राजकारणात जसं पवारांचं मोठं नाव आहे अगदी त्याच पद्धतीने त्यांचं कुटुंब देखील मोठं आहे. एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पवार कुटुंब एकत्र येतं. असाच एक फोटो राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट केला होता. शरद पवार यांच्या वाढदिवसाला सगळं कुटुंब एकत्र जमा झालं होतं. कुटुंबप्रमुखाचा वाढदिवस असल्याने सगळे जण आनंदी होते. शुभेच्छांचा फॉर्मल कार्यक्रम पार पडल्यानंतर फोटोसेशन झालं. या फोटोत 70 हून अधिक जण होते.