राहुल गांधी म्हणतात, ‘मलाही अटक करा…’
राजकारण

राहुल गांधी म्हणतात, ‘मलाही अटक करा…’

नवी दिल्ली : कोरोना लशींवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात दिल्लीत ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत २१ ठिकाणी गुन्हे दाखल केले असून १५ जणांना अटक केली आहे. हाच मुद्दा पकडत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मलाही अटक करा असं आवाहन करत ट्विटरवरून पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये मोदी जी, हमारे बच्चों की व्हॅक्सिन विदेश क्यों भेज दिया? असा मजकूर आहे. तर राहुल गांधी यांनी आपला प्रोफाईल फोटोवरही पोस्टर ठेवलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राहुल गांधी यांच्या या कृत्यानंतर लगेचच काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनीही आपला प्रोफाईल फोटो बदलत पोस्टर ठेवलं आहे. या पोस्टमुळे आता राजकीय आरोप प्रत्यारोपांना ऊत आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशात करोना लशींचा तुटवडा जाणवत असून अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद आहेत. तर अनेक जण लसीकरण केंद्रावर जाऊनही लस मिळत नसल्याने हैराण आहे. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. दिल्लीत ठिकठिकाणी लागलेल्या पोस्टरमुळे राजकारण तापलं आहे.