Rahul Gandhi : केंब्रिज विद्यापीठात राहुल गांधींनी मोदी सरकारचे केले कौतुक, ‘या’ दोन योजना आहेत चांगल्या
राजकारण

Rahul Gandhi : केंब्रिज विद्यापीठात राहुल गांधींनी मोदी सरकारचे केले कौतुक, ‘या’ दोन योजना आहेत चांगल्या

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी हे मोदी सरकारच्या धोरणांवर सातत्याने टीका करत आहेत. नऊ वर्षांपासून सत्तेत असलेल्या मोदी सरकारवर राहुल गांधी निशाणा साधत असले तरी, युनायटेड किंग्डममधील केंब्रिज विद्यापीठात पोहचल्यास मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. खरे तर मोदी सरकारचे दोन योजना चांगले असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. दोन योजना म्हणजे उज्ज्वला योजना आणि दुसरा पंतप्रधान जन धन योजना.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

खरे तर राहुल गांधी केंब्रिज विद्यापीठात असताना त्यांना विद्यार्थ्यांनी विचारले होते की, मोदी सरकारच्या दोन धोरणांबद्दल सांगू शकाल का, ज्यामुळे लोकांना फायदा झाला? यावर राहुल गांधींनी महिलांना गॅस सिलिंडर देणे आणि लोकांसाठी बँक खाती उघडणे ही चांगली गोष्ट असल्याचे उत्तर दिले. पण माझ्या मते पंतप्रधान मोदी या देशाची इमारत उद्ध्वस्त करत आहेत. त्यामुळे मला दोन-तीन चांगल्या धोरणांची फारशी चिंता नाही. ते त्यांच्या कल्पना राज्यावर लादतात.

पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत केंद्र सरकारने ३० कोटींहून अधिक बँक खाती उघडली. उज्ज्वला योजनेअंतर्गत 1.1 दशलक्ष महिलांना एलपीजी कनेक्शन मिळाले. उज्वला आणि पंतप्रधान जनधन योजनेसारख्या मोदींच्या गरीब समर्थक धोरणांचा प्रभाव राहुल गांधींनाही स्वीकारावा लागला, असे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने नमूद केले.