भाजपनेते माजी केंद्रिय मंत्र्यांचा तृणमूलमध्ये प्रवेश
राजकारण

भाजपनेते माजी केंद्रिय मंत्र्यांचा तृणमूलमध्ये प्रवेश

कोलकाता : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे माजी खासदार बाबुल सुप्रियो यांनी शनिवारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यानंतर सुप्रियो यांनी अलीकडेच भाजप सोडल्याचे जाहीर केले होते. त्यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणाही केली होती. त्यानंतर आता तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांनी तृणमूलचे सदस्यत्व दिले आहे. यावेळी खासदार डेरेक ओब्रायन देखील उपस्थित होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सुप्रियो यांनी फेसबुकवरुन राजकारण सोडण्याची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी, बाबुल सुप्रियो यांनी आपण भाजपच्या बड्या नेत्यांना भेटलो होतो, पण त्यांनी त्यांच्या पुढील निर्यणाबाबत अद्याप काहीही सांगितले नाही असे म्हटले होते. मी भविष्यात काय करणार हे फक्त वेळच सांगेल असेही सुप्रियो यांनी त्यावेळी म्हटले होते.

भाजपाचे अनेक नेते तृणमूलच्या नेतृत्वाच्या संपर्कात आहेत. ते भाजपावर समाधानी नाहीत. एक (बाबुल सुप्रियो) आज सामील झाले आहेत, दुसरे उद्या सामील होऊ इच्छित आहे. ही प्रक्रिया सुरू राहील. थांबा आणि बघत रहा, अशी प्रतिक्रिया बाबुल कुणाल घोष यांनी यावेळी दिली.