अखेर मनसेच्या इंजिनाला जोडला भाजपचा डबा; युतीची घोषणा
राजकारण

अखेर मनसेच्या इंजिनाला जोडला भाजपचा डबा; युतीची घोषणा

पालघर : भाजप आणि मनसेची युती होणार का? अशी चर्चांना वेग आलेला असतानाच अखेर मनसेचं इंजिन भाजपच्या डब्याला जोडलं गेलं आहे. पालघरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीची पोटनिवडणूक होत आहे, या निवडणुकीसाठी भाजप आणि मनसेच्या युतीची घोषणा करण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोरोनामुळे लांबलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींचा कार्यक्रम ठरला आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करत आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवास्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यामुळे भाजप आणि मनसेच्या युतीची चर्चा रंगली होती. अखेरीस पालघरपासून या युतीला सुरुवात होणार आहे.

पालघर जिल्हा परिषद पंचायत समिती पोटनिवडणूक होत आहे. यासाठी वाडा तालुक्यात भाजप-मनसे युतीची घोषणा करण्यात आली आहे. पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनीच याबद्दल माहिती दिली आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणीही या संदर्भात चर्चा सुरू आहे, असंही जाधव म्हणाले. तर पालघरचे भाजपचे अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनीही याला दुजोरा दिला आहे. तर दुसरीकडे, आता पुणे महापालिकेची निवडणूक होत आहे. पुण्यात भाजप आणि मनसेची युती व्हावी, अशी चर्चा सुरू आहे. भाजपच्या नेत्यांनी उघडपणे युतीचे संकेत दिले आहे. मात्र, अद्याप राज ठाकरे यांनी युतीबद्दल अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही.