या ठिकाणीही शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा
राजकारण

या ठिकाणीही शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा

सिंधुदुर्ग: मुंबईतील शिवसेना भवनाजवळ भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष उफाळून आल्यानंतर आता सिंधुदुर्गातही दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे तूर्तास हा वाद मिटल्याचे दिसत आहे. या संघर्षानंतर दंगल नियंत्रण पथकही सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहे. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शिवसेनेचेच्या ५५व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांना १०० रुपयांत २ लिटर पेट्रोल प्रति वाहन देण्यात येणार होते. भाजप सदस्यत्वांचे ओळखपत्र दाखवणाऱ्याना प्रत्येकी १ लिटर प्रेट्रोल मोफत देण्यात येणार होते.

कुडाळमधील भारत पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यावरून भाजप व सेना यांच्यात राडा झाला. तत्काळ पोलिसांनी हस्तक्षेप करीत यावर नियंत्रण मिळवले. या संघर्षानंतर जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपमधील वाद पुन्हा जिल्ह्यात उफळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.