भाजपला मिळाल्या ७५ टक्के देणग्या; काँग्रेसच्या वाट्याला ९ टक्के तर शिवसेना राष्ट्रवादीला…
राजकारण

भाजपला मिळाल्या ७५ टक्के देणग्या; काँग्रेसच्या वाट्याला ९ टक्के तर शिवसेना राष्ट्रवादीला…

नवी दिल्ली : भाजपने इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून जवळपास ७५ टक्के देणगी मिळवली असून काँग्रेसला मात्र फक्त नऊ टक्केच देणगी मिळवण्यात यश आलं. काँग्रेसला एकूण ३४३५ कोटींची देणगी मिळाली आहे. निवडणूक आयोगाकडून ही माहिती मिळाली आहे. तीन वर्षांपूर्वी इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून राजकीय पक्षांना देणगी मिळवण्याची योजना आणण्यात आली होती. ही संपूर्ण योजना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत जाहीर केली होती. यामध्ये देणगीदाराची ओळख जाहीर होत नसल्याने याचा वापर वाढला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भाजपबद्दल बोलायचं गेल्यास इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून मिळणाऱ्या योगदानाचा वाटा २०१७-१८ मधील २१ टक्क्यांवरून २०१९-२० मध्ये ७४ टक्क्यांवर गेला आहे. बाँडच्या माध्यमातून भाजपला मिळणाऱ्या देणगीत खूप मोठी वाढ झाली आहे. २०१७-१८मध्ये भाजपला २०१७-१८ मध्ये स्वैच्छिक योगदान म्हणून मिळालेल्या एकूण ९८९ कोटींपैकी २१० कोटी रुपये आणि २०१९-२० मध्ये ३४२७ कोटींपैकी २५५५ कोटी बॉण्डमधून मिळाले. दुसरीकडे काँग्रेसला २०१८-१९ मध्ये बाँडच्या माध्यमातून ३८३ कोटी मिळाले होते. २०१९-२० मध्ये काँग्रेसला मिळालेल्या ४६९ पैकी ३१८ कोटी बाँडमधून मिळाले असून एकूण देणगीच्या ६८ टक्के आहेत.

शिवसेनेला ४१ तर राष्ट्रवादीला २९ कोटी
याशिवाय २०१९-२० मध्ये बाँडच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला २९ कोटी २५ लाख, तृणमूल काँग्रेसला १०० कोटी ४६ लाख, डीएमकेला ४५ कोटी, शिवसेनेला ४१ कोटी, राष्ट्रीय जनता दलाला २.५ कोटी आणि आम आदमी पक्षाला १८ कोटी मिळाले आहेत.