भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांचे पितळ उघडे पडले; ट्वीटरने दाखवला आरसा
राजकारण

भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांचे पितळ उघडे पडले; ट्वीटरने दाखवला आरसा

भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय पुन्हा एकदा खोटे बोलताना पकडले गेले आहेत. यावेळी त्यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या एका फोटोविषयी खोटे बोलल्याचे समोर आले आहे. मालवीय यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला असून राहुल गांधी यांनी प्रोपोगंडा पसरविण्यासाठी हा फोटो शेअर केला असल्याचे म्हंटले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मात्र या दाव्यावर ट्विटर इंडियाने फॅक्ट चेक केला आणि मालवीयांना आरसा दाखविला. ट्विटर इंडियाने मालवीय यांचे ट्विट चुकीचे व अपूर्ण असल्याचे म्हटले आहे. ट्विटरने आपल्या पॉलिसीच्या अंतर्गत मालवीय यांनी शेअर केलेला व्हिडीओला ‘फेरफार केलेले माध्यम’ असे शिक्कामोर्तब केले आहे. म्हणजेच मालवीय यांनी जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्यात फेरफार केल्याचे म्हंटले आहे. ट्विटरने पहिल्यांदाच भारतातील एका ट्वीटवर ‘मॅनिपुलेटेड मीडिया’चे शिक्कामोर्तब केले आहे. हे यापूर्वी अमेरिका आणि इतर देशांमध्ये केले गेले आहे.

नक्की काय आहे हे प्रकरण ?
खरं तर, नवीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाबद्दल एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोत सुरक्षा दलातील एक सैनिक आंदोलनातील शेतकऱ्यावर काठी उगारताना दिसत आहे. राहुल गांधी यांनी हा फोटो त्यांच्या ट्विटरवर हे चित्र शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ”हा फोटो अतिशय दु: खी आहे आणि पंतप्रधानांच्या अहंकाराने एका जवानाला शेतकर्‍याविरूद्ध उभे केले आहे.” असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हंटले आहे.

राहुल गांधींच्या या ट्विटवर पलटवार करण्यासाठी मालवीय यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये मालवीय यांनी असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, राहुल गांधी यांनी जो फोटो शेअर केला आहे तो केवळ प्रोपोगंडा पसरविण्यासाठी शेअर करण्यात आला आहे. म्हणजेच ज्या शेतकऱ्यावर सैनिकाने काठी उगारली आहे. त्याला मारलंच नाही. पोलिसांनी त्याला हात देखील लावला नाही.”

पण जेव्हा अमित मालवीय यांचा व्हिडिओची सत्यता पडताळण्यात आली तेव्हा त्यांनी केलेला हा दावा सपशेल खोटा ठरला. आंतरराष्ट्रीय माध्यमाद्वारे शेअर केलेल्या घटनेचा हा व्हिडिओ पडताळण्यात आला. यात पोलिसांनी त्या वृद्ध शेतकऱ्याला मारल्याचे निदर्शनास आले. हे सत्य उघड झाल्यानंतर ट्विटरने मालवीय यांचा व्हिडिओ खोटा आणि फेरफार केला असल्याचे सांगत त्यांना आरसा दाखवला.