सेनेचा भाजपला झटका; माजी सचिवांच्या हातवर शिवबंधन
राजकारण

सेनेचा भाजपला झटका; माजी सचिवांच्या हातवर शिवबंधन

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावर गरम होत असताना मुंबईमध्ये भाजपला एक मोठा झटका शिवसेनेने दिला आहे. सत्ताधारी शिवसेनेनं इन्कमिंग सुरू झाले असून भाजपचे माजी सचिव समीर देसाई यांनी पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर मुंबई भाजपचे माजी सचिव समीर देसाई यांनी हातावर शिवबंधन बांधून शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. समीर देसाई हे काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी खासदार गुरुदास कामत यांचे भाचे आहेत. बीएमसी निवडणुकांच्या तोंडावर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली असताना भाजपसाठी हा मोठा धक्का आहे.

काँग्रेसमधून त्यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला होता. मात्र, भाजपमधील अंतर्गत गटबाजीला वैतागून त्यांनी आज शिवसेनेत पक्ष प्रवेश केल्याची माहिती मिळत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीला एक वर्षाचा अवधी उरला असताना शिवसेनेत आता इन्कमिंग सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

काँग्रेसच्या तिकिटावर दोनवेळा नगरसेवक
समीर देसाई हे काँग्रेसकडून दोन वेळा नगरसेवक राहिले होते. त्यांनी मुंबई काँग्रेसचे प्रवक्तेपदही भूषवलं आहे. सलग दहा वर्ष समीर देसाई मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य होते.