भाजपनेते चंद्रशेखर बावनकुळे पोलिसांच्या ताब्यात
राजकारण

भाजपनेते चंद्रशेखर बावनकुळे पोलिसांच्या ताब्यात

नागपूर : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन नागपुरात आंदोलन करणारे भाजपनेते चंद्रशेखर बावनकुळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नागपूरच्या मानेवाडा चौकात रास्ता रोको करण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांनी केला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून राज्यातील मंत्र्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही असा इशाराही बावनकुळे यांनी आंदोलनादरम्यान दिला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर हे आंदोलन थांबवण्यात आलं आहे. या आंदोलनात बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आमदारही सहभागी झाले होते. रस्त्यावर बसून वाहतूक रोखून धरण्याचा प्रयत्न या आंदोलनादरम्यान करण्यात आला होता. नागपूरातल्या वर्दळीच्या मानेवाडा चौकातली वाहतूक साधारण अर्धा तास रोखून धरण्यात आली होती.कोणतीही पूर्वसूचना न देता करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे पोलिसांना बळजबरी करत कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं.

पोलिसी बळाचा वापर करुन ओबीसी आरक्षणासाठीचं आंदोलन चिरडलं जात असल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला आहे. सध्या हे आंदोलन संपुष्टात आलं असलं तरी यापुढे शहराच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.