BJP
राजकारण

‘बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी’ म्हणत सामनाच्या अग्रलेखावरून भाजपनेत्याचे प्रत्युत्तर

मुंबई : ”महाराष्ट्रातील बेईमानांच्या पाठीशी जे उभे आहेत, त्यांना १०६ हुतात्म्यांचे तळतळाट लागतील. मुंबाई मातेचा अवमान करणाऱ्यांची नावे महाराष्ट्राच्या इतिहासात डांबराने लिहिली जातील,” सामनाच्या अग्रलेखातून अशी खरमरीत टीका आज शिवसेनेने अप्रत्यक्षरित्या भाजपावर केली आहे. त्यावर  “बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी”, अस सूचक विधान करत या टीकेला भाजप नेते आशिष शेलार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आशिष शेलार यांनी एकापाठोपाठ एक ट्विट करत शिवसेनेवर प्रश्नांची सरबत्तीच केली आहे. ट्विट करुन आशिष शेलार म्हणाले की, बात “हरामखोरीची”निघाली तर मग “डांबराने” लिहीले जाईल असे मुंबईकरांना बरेच आठवेल! १०६  हुतात्म्यांना गोळ्या घालणाऱ्या काँग्रेस सोबतच सत्तेत बसलात ना? मुंबाई मातेचा अपमान कोण करतेय? बेईमानी नेमकी कोण करतेय? हुतात्म्यांचे तळतळाट तुम्हाला तर लागणार नाही ना? ऐवढे तपासून पहा असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला आहे.

”कर्तबगार मुंबई पोलीसांवर, मुंबईकरांवर गोळ्या झाडणाऱ्या कसाबला “बिर्याणी” घालणाऱ्यांसोबत तुम्ही सत्तेची “बिर्याणी” खाताय ना? याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्यालाच मुंबईचा पालकमंत्री केलेत ना? बेईमानी, तळतळाट हे तुम्हालाच तर लागत नाहीत ना? “बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी”, अस सूचक विधानही त्यांनी यावेळी केलं.

तसेच ”मुंबई साखळी बाँम्ब स्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांना मारणाऱ्या टायगर मेमनच्या माहिमच्या घरात, आँफिसमध्ये महापालिका बुलडोझर घेऊन घुसवलीत होती का? पण रस्त्यावरच्या खड्यांवर बोलणाऱ्या रेडिओ जॉकी मलीष्काच्या घरात आणि कंगना रौनातच्या घरात पालिका अधिकारी घुसवलेत ना? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

यापाठोपाठ त्यांनी दुसर ट्वीट केल आहे की, ‘भारत तेरे तुकडे हो हजार, असे म्हणणाऱ्या उमर खालिद गँगला मुंबईत येण्यास कधी रोखले नाहीत ना? त्यांच्या कार्यक्रमात सोबत बसायला निघाला होतात ना? गेट वे ऑफ इंडियाला आझाद काश्मीरचा फलक झळकवणाऱ्या देशविरोधी मेहक प्रभूच्या घरात पालिका कधी घुसवली नाहीत ना? असाही त्यांनी विचारलं आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत