राजकारण

बैलगाडा शर्यतीप्रकरणी पडळकरांसह ४९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Bjp Mla Gopichand Padalkar and 49 Persons case filed due to Sangli Bullock Cart Raceसांगली : सर्वोच्च न्यायालयाचा मनाई आदेश डावलून आटपाडी तालुक्यामध्ये बैलगाडा शर्यती आयोजित केल्याप्रकरणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह ४९ जणांविरुद्ध आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बैलगाडा शर्यती आयोजनावर बंदी असताना पडळकर यांच्या पुढाकाराने आटपाडी तालुक्यातील बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. महसूल व पोलीस प्रशासनाने पडळकर यांच्यासह संबंधित कार्यकर्त्यांना नोटिसाही बजावल्या होत्या. तरीही वाक्षेवाडी पठारावर काल सकाळी सहा ते सात वाजणेच्या सुमारास शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.

प्राण्यांना निर्दयतेने वागविणे आणि आपत्ती निवारण कायद्याचा भंग केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे दाखल झालेल्यामध्ये आ. पडळकर यांच्यासह गणेश भुते, लहू कोकरे, सोपान माळवे, संपत कोकरे, नवनाथ कोकरे, दत्ता पाटील, उत्तम गलांडे आदींसह ४९ जणांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.