राजकारण

‘राजेंद्र शिगणेंकडे १०० कोटी वसुलीचं टार्गेट’

मुंबई : राज्यात राजकीय वातावरणही चांगलंच तापलं आहे. ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकावर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर भाजप नेत्यांनी संताप व्यक्त केला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिकांना प्रत्युत्तर देताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या अकार्यक्षमतेवर पांघरूण घालण्यासाठी ते भाजपावर बेछूट आरोप करत असल्याची टीका केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

असं वाटतं की, राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणेंवर आता शंभर कोटीचं वसुलीची जबाबदारी किंवा टार्गेट दिलं आहे. महाराष्ट्र सरकार अपयशी ठरलं आहे म्हणून भाजपवर आरोप करत आहे, असेही पडळकर म्हणाले. नवाब मलिक ज्या गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, तिथे काल एकाच दिवसात ॲाक्सिजन अभावी १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या रुग्णांच्या नातेवाईकांना आधार देण्याऐवजी, स्वत;चं पाप झाकण्यासाठी आपल्या अकार्यक्षमेतवर पांघरूण घालण्यासाठी ते भाजपवर बेछूट आरोप करत आहेत. पण हा महाराष्ट्र आहे. नवाबभाई ये पब्लिक है सब जानती है… असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.

आरोग्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेण्याऐवजी बघ्याची भूमिका घेत हात झटकले आहेत. ॲाक्सिजनअभावी महाराष्ट्रात एक पण मृत्यू झाले नाहीत असं वक्तव्य केलं आहे. ही कोणती संवेदनशीलता? अशी विचारणा गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *