राजकारण

भाजप खासदाराच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या जोरदार चर्चा

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव दौऱ्यात एकनाथ खडसेंच्या कोथळी येथील घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी खडसेंच्या सून आणि भाजप खासदार रक्षा खडसे यांच्यासह इतर भाजप पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. एकनाथ खडसे यांनी भाजप सोडताना केलेल्या गंभीर आरोपांनंतरही फडणवीस घरी गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. एकनाथ खडसेंपाठोपाठ भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगत आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे यांची भेट घेतल्यानंर खडसे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने भाजप खासदाराच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाच्या चर्चेबाबत विचारण्यात आलं असता रक्षा खडसे यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे की, अशा चर्चा खूप होत असतात, पण जोपर्यंत मी काही अधिकृत सांगत नाही तोपर्यंत त्याला काही अर्थ नाही. पक्षाने जबाबदारी दिली तर पुढील निवडणूकही भाजपकडूनच लढणार असल्याचं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, जाहीर प्रवेशात एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देवेंद्र फडणवीस यांनी आपलं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्यामुळेच आपण पक्षत्याग करत असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं. याचसोबत त्यांनी एकटे देवेंद्र फडणवीस पक्ष चालवतात असा गंभीर आरोपही केला होता. दरम्यान खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असला तरी रक्षा खडसे अद्याप भाजपातच आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *