भाजपच्या माजी केंद्रिय मंत्र्यांची आमदारीकीसाठी वर्णी; पक्षाकडून नाव जाहीर
राजकारण

भाजपच्या माजी केंद्रिय मंत्र्यांची आमदारीकीसाठी वर्णी; पक्षाकडून नाव जाहीर

नवी दिल्ली : भाजपने माजी केंद्रीयमंत्री शाहनवाज हुसैन यांना बिहारमध्ये विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुणसिंह यांनी आज (ता. १६) उमेदवारांची यादी जाहीर केली. बिहारमध्ये दोन जागांसाठी निवडणूक होत आहे. या दोन्ही जागा भाजपच्या कोट्यातीलच आहेत. ज्यामधील एक सुशील मोदी यांची राज्यसभेवर वर्णी लागल्याने, रिकामी झालेली आहे. तर, दुसरी जागा विनोद कुमार झा हे आमदार झाल्याने रिक्त झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यातील सद्यस्थितीस आमदारांची संख्या पाहता २८ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत भाजपला आपली एक जागा गमावावी लागण्याची शक्यता आहे. ज्याचा थेट फायदा विरोधी पक्षास होणार आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेवदवारांची नावं निश्चित केली आहेत.

बिहारमधील विधानपरिषदेच्या दोन जागांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १८ जानेवारीपर्यंत चालणार आहे. विनोद नारायण झा यांच्या रिक्त होणाऱ्या जागेचा कार्यकाळ २१ जुलै २०२२ असणार आहे. तर सुशील कुमार मोदी यांच्या जागेचा कार्यकाळ ६ मे २०२४ पर्यंत असणार आहे. तर, उत्तर प्रदेशमध्ये विधानपरिषदेच्या १२ जागांवर निवडणूक होत आहे. यापैकी भाजपाकडून सहा उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. कुंवर मानवेंद्र सिंह, गोविंद नारायण शुक्ला, सलील बिश्नोई, अश्विनी त्यागी, धर्मवीर प्रजापती आणि सुरेंद्र चौधरी अशी उमेदवारांची नावं आहेत.